जळगाव मनपाच्या तत्कालीन उपायुक्तांवर अत्याचाराचा गुन्हा

0

नोकरीला लावून देण्याचे दिले होते आमिष : विधवेची शहर पोलिसात फिर्याद

जळगाव, दि.6 –
येथील मनपात नोकरीला लावून देणे, घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालिन उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी साजिद अमानउल्ला पठाण (वय 50 रा.शिवाजी नगर,जळगाव) यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विधवा महिलेने पठाण यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केली आहे.
विधवा व गरीब महिलांना मनपाकडून घरकुल मिळेल अशी 2011 मध्ये वृत्तपत्रात जाहीरात आल्यानंतर पीडित विधवा महिला एका महिलेसोबत महापालिकेत उपायुक्त साजीद पठाण यांना भेटायला गेली होती. त्यावेळी पठाण यांनी नोकरीला लावून देण्याचे आश्‍वासन दिले व त्यांचा मोबाईल क्रमांक देऊन नंतर भेटण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर पठाण व पीडित महिला या दोघांमध्ये संपर्क वाढत गेला.
शासकीय वाहनाचाही उपयोग,
रुग्णालयात देखील अत्याचार
महिन्याभरानंतर लग्नासाठी औरंगाबादला जायचे आहे असे सांगून शासकीय वाहनाने पठाण पिडीतेला सोबत घेवून गेले. तेथे रस्त्यात अजिंठा गावाच्या पुढे गेल्यावर कोणाचा तरी फोन आला व त्यावेळी पठाण यांनी कार माघारी घेतली. मोकळ्या स्मशान जागी कार लावून त्यातच जबरदस्तीने पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर पुन्हा गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांच्या दवाखान्यात बोलावून तेथेही अत्याचार केला.
शंभू सोनवणे, डॉ.राजेश पाटीलसह आरोपी
अत्याचार प्रकरणात शंभू सोनवणे व गेंदालाल मील भागातील डॉ.राजेश पाटील यांनी एक प्रकारे पठाण यांना मदत केली आहे. त्यामुळे पीडित महिलेने या दोघांविरुध्दही तक्रार दिल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. 2016 नंतर साजीद पठाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाल्याने त्याने संपर्क कमी केला व लग्नही केले नाही. फसवणूक केल्याची खात्री झाल्याने पीडित महिलेने शनिवारी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.