Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»‘जळगाव पॅटर्न’ आता राज्यभर: शालेय शिक्षण विभागाचा माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा निर्णय
    ब्रेकिंग

    ‘जळगाव पॅटर्न’ आता राज्यभर: शालेय शिक्षण विभागाचा माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा निर्णय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 4, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘जळगाव पॅटर्न’ आता राज्यभर: शालेय शिक्षण विभागाचा माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा निर्णय

    जळगाव,प्रतिनिधी I राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळांच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, शाळेशी भावनिक नाते दृढ करणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून प्रथम जळगावात राबवलेला हा नाविन्यपूर्ण प्रयोग, आता ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून राज्यभर लागू होणार आहे.

    ‘जळगाव पॅटर्न’ची पायाभरणी
    मिनल करनवाल यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापनेची संकल्पना जाहीर केली होती. सध्या जळगाव जिल्ह्यात २० हून अधिक माजी विद्यार्थी संघ यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांच्या उपक्रमांमुळे शाळांच्या भौतिक सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. या यशस्वी प्रयोगामुळे शालेय शिक्षण विभागाने हा पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आदेश जारी केले आहेत.

    शासनाच्या मार्गदर्शक सूचना

    संघाची रचना: माजी विद्यार्थी संघात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि मुख्याध्यापक/प्राचार्य (सचिव म्हणून) असतील. याशिवाय एक पालक प्रतिनिधी आणि निवृत्त शिक्षक किंवा अधिकारी सल्लागार सदस्य म्हणून सहभागी होतील.मेळावे आणि स्नेहसंमेलन: प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थी मेळावा किंवा स्नेहसंमेलन आयोजित करणे बंधनकारक आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांच्या निमित्ताने हे कार्यक्रम होणार आहेत.
    उपक्रम: माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, शाळेचा विकास आराखडा, शिक्षक सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.

    माजी विद्यार्थ्यांचे योगदान
    माजी विद्यार्थी शाळांच्या भौतिक सुविधांच्या उभारणीत मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य करतील. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती आणि प्रेरणा देण्यावर भर असेल. तसेच, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली जाईल. यासाठी शासनाने विशेष ऑनलाइन नोंदणी प्रणाली विकसित केली असून, प्रत्येक माजी विद्यार्थ्याची नोंदणी अनिवार्य आहे. शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो आणि अहवाल या पोर्टलवर अपलोड करावे लागतील.

    ‘जळगाव पॅटर्न’चा प्रभाव
    जळगाव जिल्ह्यात मिनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने शाळांचा चेहरामोहरा बदलला आहे. हा प्रयोग आता राज्यभर राबवला जाणार असल्याने, जळगावने शालेय शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. माजी विद्यार्थी संघांमुळे शाळा आणि समाज यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात

    July 20, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif