जळगाव नशिराबाद मध्ये दारूच्या दुकानांवर धाडी
एक्साइज आणि एलसीबी पोलिसांची ची संयुक्त कारवाई
जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी कारवाई होणार दिला विश्वास
जळगाव – शहरातील आर. के. वाईन आणि नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स आणि कामदार या वाईन शॉप वर स्थानिक गुन्हे शाखा आणि एक्साईज या विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली आहे. रविवार पहाटे पासून स्टॉक मोजणीचे आणि तपासणी चे काम सुरू केले आहे. संचार बंदीच्या काळात दारूचा मोठा साठा विकला गेला असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्या मुळे ही कारवाई होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिली. बंद च्या काळात ही सर्वात मोठी कारवाई होत आहे यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे या महत्वपूर्ण कारवाई मुळे प्रशासनचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. लाखो रुपयांची दारू बंद च्या काळात विकली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे वास्तविक वाइन सेंटर मधून कोणतेही विक्री झाल्यावर सरकार दरबारी तात्काळ ऑनलाईन नोंद होत असते. मात्र अशी कोणतीही नोंद न करता दुकानातली दारू विकली गेली एक संपूर्ण गोडाऊन च्या गोडाऊन या काळात खाली झाले आहे असेही सांगितले जात आहे दरम्यान या दारू दुकानदारांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बंदच्या काळात दारूची विक्री करणे हा अक्षम्य गुन्हा आहे
ही कारवाई एक्ससाइज चे दहीवडे साहेब आणि स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी बापु साहेब रोहम हे संयुक्तरित्या करीत आहे. रोहम साहेब आणि दहिवडे साहेब यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी कारवाई निश्चित होणार जळगावात चुकीला माफी नाही दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा विश्वास लोकशाही लोक लाईव्ह शी बोलतांना दिला