जळगाव । जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. आज जिल्ह्यात तब्बल ११६७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ११४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
जिल्ह्यात आज ११६४ आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९० हजार १८५ झाली आहे. तर आज ११४४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार ७३४ वर गेली आहे. दरम्यान, आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १६३८ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ८१३ रुग्ण उपचार घेत आहे.
आजचे रुग्ण
जळगाव शहर १०१, जळगाव तालुका १४, भुसावळ १२६, अमळनेर १२२; चोपडा ३०७; पाचोरा २८; भडगाव ६५; धरणगाव ४६; यावल ५६; एरंडोल २७, जामनेर ७७; रावेर ६५, पारोळा १९; चाळीसगाव ५९; मुक्ताईनगर २१; बोदवड ३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे ११६७ रूग्ण आढळून आले आहेत.

