जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येचा दिलासा

0

जळगाव : जिल्ह्यात सलग दुसरा दिवस दिलासा देणारा ठरला. आज गुरुवारी पुन्हा नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या आत म्हणजे ९३४ एवढा नोंदला गेला. तर आज तब्बल ११७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मात्र चिंताजनक असे की आज पुन्हा २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या स्थिर होती. मात्र, सोबतच रोजचे मृत्यूही कायम असल्याने मृत्यूदरही कमी होत नव्हता. बुधवारी तर सर्वाधिक २१ मृत्यू नोंदले गेले होते. त्यांनतर आज पुन्हा २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे बळींचा आकडा १८६८ वर पोचला आहे.

रुग्णसंख्येचा दिलासा

दुसरीकडे गेल्या १५ दिवसांपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या हजार, अकराशे व अगदी तीनवेळा तर बाराशेच्या वर गेली. मात्र गेल्या दोन दिवसापासून नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या आत येत आहे. आज ९३४ नवे रुग्ण आढळून आले आहे.  त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ६ हजार ०७० वर पोचली. आज होणाऱ्यांचा आकडा अधिक म्हणजे ११७४ होता. बरे होणाऱ्यांची संख्याही ९२ हजार ८७३ झाली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २२०, जळगाव तालुका ४३, भुसावळ ४२, अमळनेर २४; चोपडा ७३; पाचोरा ८; भडगाव १२; धरणगाव ५८; यावल ३१; एरंडोल ८४, जामनेर ८५; रावेर १०६, पारोळा २६; चाळीसगाव ६३, मुक्ताईनगर ४०; बोदवड ८ आणि इतर जिल्ह्यातील ११ असे ९३४ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.