जळगाव जिल्ह्यात रुग्ण संख्या घटतेय : आजही नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

0

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. महिनाभरापासून सातत्याने नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा कमी येत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १२८ कोरोना बाधित आढळून आले आहे. तर आजच २३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहेत.

जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सात-आठशे, हजारांच्या वर दररोज नवे रुग्ण आढळून येत होते. ती संख्या १७ सप्टेंबरपासून सातत्याने कमी होत आहे. सध्या रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या शंभर- दोनशेच्या घरात आत नोंदली गेली. आज शुक्रवारी १२८ नवे बाधित आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ६९७ झाली आहे. तर २३८ बरे झालेल्यांसह एकूण बरे होणारे रुग्ण ४८ हजार ३५५ आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ९३.५४ वर गेला आहे.  गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा बळी गेला, त्यामुळे एकूण बळींचा आकडा १२३७ वर पोचला.

जळगाव शहर – २४, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- १८, अमळनेर-२२, चोपडा-०१, पाचोरा-०६, भडगाव-०३, धरणगाव-०३, यावल-०९, एरंडोल-००, जामनेर-०६, रावेर-०२, पारोळा-०२, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-०२,बोदवड-०६ आणि अन्य जिल्हा ०२ असे एकुण १२८ रूग्ण आज आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.