जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे पन्नाशीच्या आत राहत असलेली नव्या रुग्णांची संख्या मात्र बुधवारी वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढवणारी आहे.
जिल्ह्यात आज बुधवारी ७१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ३७ कोरोनामुक्त झाले आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर –२३, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ- ११, अमळनेर- ०७, चोपडा-०४, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०१, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-०२, रावेर-०५, पारोळा-०२, चाळीसगाव-०७, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ७१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५५ हजार ५६२ पर्यंत पोहचली असून ५३ हजार ८२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आतापर्यंत १३१९ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ४१९ रुग्ण सध्या उपचार घेताय.