जळगाव जिल्ह्यात पहिल्या तीन तासात ६ टक्के मतदान

0

जळगाव : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पहिल्या सकाळी १०.४५ पर्यंत ६.१३ टक्के मतदान झाले.

आज सकाळी तुरळक पाऊस सुरू राहील्याने मतदानाचा उत्साह फारसा दिसून आला नाही. सकाळी ७ वा. मतदानाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात जिल्ह्यात अवघे ५ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. यात चोपडा मतदारसंघ ४.५० टक्के, रावेर ६.७८, भुसावळ ३.२५, जळगाव शहर २.४९, जळगाव ग्रामीण ११, अमळनेर ५.०६, एरंडोल ९, चाळीसगाव ९.५०, पाचोरा ३.८४, जामनेर ४.०८, मुक्ताईनगर ७ टक्के असे एकुण ५ टक्के मतदान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.