जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी सकाळी दमदार पुनर्रागमन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे बरसणाºया आनंदसरींनी बळीराजासह सर्वच जण सुखावले असून पिकांनाही जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थान परिसरातही जोरदार पाऊस झाला. यामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी, पूर्णा नदीला पूर आला आहे. दुसरीकडे वाघूर नदीलाही पूर आला आहे.
जून महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली खरी मात्र मध्यंतरी वारंवार पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची चिंता बळीराजाला लागली. तसे पाहता जून महिन्यात पावसाचा कमीच अंदाज वर्तविला होता. मात्र आता सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाला.

