जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात नव्याने २१७ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले. अहवाल नुसार यात जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७४९२ इतकी झाली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ९८ , जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ १६, अमळनेर १०, चोपडा ०६, भडगाव ०२, धरणगाव ०२, पाचोरा ०५, चोपडा ०६, यावल ०५, एरंडोल २३, जामनेर १२, रावेर १६, पारोळा ०१ , चाळीसगाव १०, मुक्ताईनगर ०१, बोदवड १, इतर जिल्ह्यातील ०१ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, आज तब्बल २३४ रुग्ण बरे झाले आहे.

