जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी ; शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला

0

जळगाव :  जिल्ह्यात ठिकठिकाणी आज शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.  या अवकाळी पावसाने  हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना फटका बसला.

 

चाळीसगाव तालुक्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपीट होऊन जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले. नुकतेच शेतकऱ्यांनी शाहू,ज्वारी,बाजरी, गहू, हरभरा,कापणी केली आहे सर्व माल शेतीमध्ये पसार पडल्याने शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा या अवकाळी पावसाने हिसकावला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत असून अडचणीत सापडला आहे.

 

दरम्यान उत्तर व मध्य महाराष्ट्रासाठी 20 मार्च रोजी वादळी वाऱ्याचा इशारा भारतीय हवामान (आयएमडी) विभागाने दिला आहे. तर 21 मार्च रोजी पुणे, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी वादळी वऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दिनांक 22 मार्च रोजी जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या गडगडासह वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.