Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार नागरीकांचे लसीकरण
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार नागरीकांचे लसीकरण

    By April 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 201 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 18 हजार 272 नागरीकांना दुसरा डोस दिल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

    जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

    कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली असून नागरीकांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्रही वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 201 नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर 18 हजार 272 नागरीकांना दुसरा डोस घेतला आहे. पैकी सर्वाधिक 52 हजार 154 नागरीकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे तर 26 हजार 932 नागरीकांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खाजगी रुग्णालयामार्फत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026

    शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif