Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव जिल्ह्यात आज ११७९ जणांना कोरोनाची लागण, ११५९ रुग्ण कोरोनामुक्त
    ताज्या बातम्या

    जळगाव जिल्ह्यात आज ११७९ जणांना कोरोनाची लागण, ११५९ रुग्ण कोरोनामुक्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी

    जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी होत नाहीये. आज देखील ११७९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात ११५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, जळगाव शहरानंतर आता चोपडा तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. भुसावळमध्येही आज दीडशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे.

    त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९३ हजार ६०० झाली आहे. तर आज ११५९ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ३३९ वर गेली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १६८२ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ५७९ रुग्ण उपचार घेत आहे.

    आज जळगाव शहर २४८, जळगाव तालुका २३, भुसावळ १५५, अमळनेर ५१; चोपडा २५७; पाचोरा ३६; भडगाव २९; धरणगाव ६१; यावल ५२; एरंडोल ३७, जामनेर ५५; रावेर ६८, पारोळा ३२; चाळीसगाव ०६, मुक्ताईनगर ०९; बोदवड ४९ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे ११७९ रूग्ण आढळून आले आहेत.

    जळगावकरांनी लवकरात लवकर नियमांचे पालन करून कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif