जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभरात १०६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संक्रमित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सध्या आता जिल्ह्यात केवळ २४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
तर जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार २०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार १९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ०१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५५८ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या २४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-१६, अमळनेर-०, चोपडा-३, पाचोरा-७, भडगाव-० , धरणगाव-०, यावल-१०, एरंडोल-६४, जामनेर-१४, रावेर-३, पारोळा-८, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-२, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.