जळगाव जिल्ह्यात आज फक्त 5 कोरोना बाधित रुग्ण, 60 रुग्ण कोरोनामुक्त

0

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा न्यूनतम पातळीकडे पोहचला असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त पाच बाधीत रूग्ण आढळून आले असून ६० पेशंटनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर व जामनेर तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नसल्याची बाब लक्षणीय आहे.

आजच्या अहवालात जळगाव शहर-२, जामनेर-३ असे पाच रूग्ण आढळून आले आहे. उर्वरित १३ तालुके निरंक असल्याचे आजच्या अहवालात दिसून आले आहे.  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आजच्या अहवालात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३६१ रूग्ण बाधित आढळले आहे. तर १ लाख ३९ हजार ३३५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात चाळीसगाव तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.