जळगाव जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील काही दिवस ढगाळ ते मेघमय वातावरण राहणार असून, २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी विजांसह पाऊस, वादळी वारे तसेच स्थानिक टोरणे यांचा धोका असल्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय हवामान विभागाने बहु-जोखीम चेतावणी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आगामी काही दिवस कोरडे हवामान अपेक्षित नसून, वारंवार पाऊस आणि अचानक वादळांचा धोका राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शेतमालासह पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

