Thursday, February 2, 2023

जळगाव जिल्ह्यात आज ‘इतके’ कोरोना बाधित रुग्ण

- Advertisement -

जळगाव  । प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. आज रविवारी जिल्ह्यात  नवीन बाधित  चार रूग्ण आढळून आले आहे. यात चोपडा आणि चाळीसगाव वगळता सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

- Advertisement -

आजच्या अहवालात चोपडा-१ आणि चाळीसगाव-३ असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजच्या अहवालात जिल्ह्यात सद्य परिस्थीत जिल्हाभरात केवळ ९२ बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात सहा बाधित रूग्ण कोरोना मुक्त झाली आहेत. अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ५५९ रूग्ण कोरोना संक्रमित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८९२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे