जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 54 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त

0

जळगाव  – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्य:स्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 56 हजार 659 रुग्णांपैकी 54 हजार 812 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 502 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 345 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.74 आहे, तर मृत्युदर 2.37 टक्के इतका आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत तपासणीसाठी लॅबमध्ये 4 लाख 10 हजार 235 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 56 हजार 659 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच जिल्ह्यात 354 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 168 व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.