जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार पार

0

जळगाव (प्रतिनिधी) । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सलग ५ व्या दिवशीही ५०० हून अधिक रुग्ण आढळून आले. आज नव्या सर्वाधिक ५९५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.  आज सर्वाधिक १४४ पॉझिटिव्ह रुग्ण हे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण बाधिताचा आकडा ४ हजार २४४ वर गेला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७ हजार १३१ इतकी झाली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ३३५ रुग्ण हे नियमित आरटी-पीसीआर चाचणीतून तर २६० रुग्ण हे अँटीजेन चाचणीतून समोर आले आहेत. त्यात  जळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ७, अमळनेर ७७, चोपडा २५, पाचोरा २७, भडगाव ०६, धरणगाव ४०, यावल ६, एरंडोल ६५, जामनेर ३५, रावेर ०७, पारोळा ५३, चाळीसगाव ३०, मुक्ताईनगर ४१, बोदवड २ आणि अन्य जिल्ह्यातील ९ असे एकूण ५९४ रुग्ण आढळून आले आहे.

दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात ४०३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ७२८ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ७५६  ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज ०९ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण ६४७ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.