जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात २८३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक रूग्ण जळगाव शहरात ९५ आढळून आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ३६ इतकी झाली आहे
तर आज ०९रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या चार- पाच दिवसांपासून नव्याने बाधित रुग्णांच्या बरोबरीने रुग्ण बरेही होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात आज २६६ रूग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या ८ हजार ४६९ झाली आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ९५, जळगाव ग्रामीण ३३, भुसावळ ०३, अमळनेर २४, चोपडा ३४, पाचोरा ०२, भडगाव ०३, यावल १३, धरणगाव ०४, एरंडोल २२, जामनेर २४, रावेर ०६, पारोळा ०५, चाळीसगाव ०१, मुक्ताईनगर १४.