जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्यामध्ये आज मतदान होतं आहे. यात दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघात मतदान होत असून यात महाराष्ट्रातल्या १४ मतदारसंघाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात आज सकाळी ७ वाजेपासून जिल्हयातील एकूण 3 हजार 200 मतदान केंद्रावर मतदान सुरु असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. जळगाव मतदार संघातून 14 तर रावेरमधून 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.जिल्हयातील 26 उमेदवारांचे भवितव्य सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यत मतदान यंत्रात बंद झाले आहे. 310 शहरी तर 818 ग्रामीण मतदान केंद्रावर 2462 इव्हिएमसह 2689 व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतपेटीत बंद होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, राजू शेट्टी, चंद्रकात खैरे या दिग्गजांचं भविष्य आज मतदानपेटीत बंद होईल. तर या टप्प्यात सर्वांत गाजलेला मतदारसंघ माढा तसंच जळगाव, जालना, रावेर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, इथेही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.