Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव जिल्हा सह. बँक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !
    ताज्या बातम्या

    जळगाव जिल्हा सह. बँक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !

    By November 24, 2020Updated:November 24, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजासंदर्भात सहकार व पणन तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगावी परिसंवाद झाला . त्यात जिल्हा बँकेच्या संदर्भात विशेषतः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करण्यासंदर्भात अनेकांनी आपले विचार मांडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिल्हा बँकेने मदत करायला हवे . परंतु दुर्दैवाने जिल्हा बँकेची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याची टीका केली . पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेवर जे त्यांनी टीकास्त्र केले त्याबद्दल गुलाबरावांचे अभिनंदन केले पाहिजे . कारण महाराष्ट्रात ज्या महाविकास आघाडीची सत्ता आहे त्यातील ते कॅबिनेट मंत्री असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

    जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेला कानपिचक्या दिल्या. जिल्हा बँक हि कोणा एकाच्या मालकीची नाही. शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे. बँकेने बँकांप्रमाणे धंदा करावा. शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही तरी देणार कोणाला ? कर्जबाजारी शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी करून बँकेत त्याच्या खात्यावर पैसे जमा केले . शेतकरी कर्जमुक्त झाला . परंतु अशा कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याऐवजी तो पैसे भरत नाही म्हणून त्याचे खात्यावरील कर्ज नील झाले असतांनासुध्दा कर्ज न देणे हे बँकेचे चुकतेय हा गुलाबराव पाटलांचा मुद्दा पटणारा आहे. एखादवेळी खाजगी बँकांनी असे केले असते तर ते समजू शकले असते. परंतु शेतकऱ्यांची मालकी असलेल्या बँकेने केवळ एनपीएवरून बाऊ करून शेतकऱ्यांनाच कर्ज नाकारणे हे धोरण चुकीचे आहे . कोणतीही बँक कर्ज देते तेव्हा त्या कर्जाची वसुली करण्याची यंत्रणासुद्धा त्या बँकेकडे असते . जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हाभरात 239 शाखा आहेत . 500 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग आहे.  

    जिल्ह्यात 700 सहकारी सोसायट्या आहेत. बँकेला फार मोठा वारसा असून बँकेने आपला धंदा वाढविण्यासाठी काय प्रयत्न केले ? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर जिल्हा बँकेचे धंदा वाढविण्याचे प्रयत्न शून्य आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केले . त्यामुळे कसलेही प्रयत्न न करता बँकेची घरबसल्या कर्जाची वसुली झाली. जिल्हा बँकेच्या तुलनेत जळगाव जिल्हयात जळगाव जनता सह . बँक, जळगाव पीपल्स को – ऑपरेटिव्ह बँक यांची मेहनत , त्यांचा धंदा वाढविण्याचा प्रयत्न लक्षवेधी म्हणावा लागेल . जिल्हाभरात त्यांची यंत्रणा जिल्हा बँकेच्या तुलनेत तोकडी असतांना

    त्या बँकांच्या धंद्यांचा विस्तार कितीतरी पटीने चांगला आहे . त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात जी व्यथा व्यक्त केली ती योग्यच म्हणावी लागेल. त्यांची व्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे हे नाकारता येणार नाही.

    सहकार क्षेत्र तसेच सहकारी तत्वावर उभारलेल्या संस्था समृद्ध व्हाव्यात किंबहुना त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी जिल्हा बँकेचे सहकार्य त्यांना मिळाले पाहिजे. 25 वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्र समृद्ध होते. जिल्ह्यात असलेले पाचही सहकारी साखर कारखान्याचे दिवाळे निघाले . ते बंद पडले. मुक्ताईनगरचा साखर कारखाना आणि चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखाना खाजगी व्यक्तीला विकला गेला . परंतु त्यापैकी फक्त मुक्ताई हा खाजगी साखर कारखाना सुरु आहे. बाकी चार कारखाने क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे . चोपडा सहकारी साखर कारखाना तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेचे सहकार्य लाभले तर ते सुरु होऊ शकतात . परंतु जिल्हा बँकेच्या आडमुठे धोरणामुळे त्या कारखान्याची घरघर सुरु आहे. तीच अवस्था सहकार क्षेत्रातील सूतगिरण्याची झाली आहे. भुसावळचे खडका सह . सूतगिरणी, नगरदेवळ्याची सह. सूतगिरणी या काही वर्षांपासून बंद आहेत . यावलची सूतगिरणीसुद्धा अलीकडे बंद पडली आहे. चोपड्याची सूतगिरणी कशीबशी तग धरून आहे . आज मुक्ताईनगरची सूतगिरणी बँकेच्या मेहरबानीमुळे सुरु आहे. जामनेरजवळ कोट्यवधी रुपये बँकेचे कर्ज घेऊन उभारलेली स्टार्च फॅक्टरी बंद पडली. जामनेरचा नियोजित सह. कारखाना तर उभरूच शकला नाही. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची हि बिकट परिस्थिती पहिली तर सहकार हि संकल्पना मोडीत निघते आहे. त्याला जबाबदार हे त्या-त्या प्रकल्पाचे व्यवस्थापन मंडळ असले तरी त्याला जिल्ह्यातील राजकीय नेते आणि जिल्हा बँक जबाबदार आहे . एवढे मात्र निश्चित . चोपडा सहकारी साखर कारखान्याचा तर जिल्हा बँकेकडून फुटबॉल सारखा वापर केला गेला . केवळ जातीचा चेअरमन बदलला म्हणून त्या कारखान्याला सहकार्य न करण्याची भूमिका कोणत्या तत्वात बसते ?

    जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे यापूर्वीसुद्धा आणि विरोधात असतानांसुद्धा जिल्हा बँकेविषयी आपले परखड मत व्यक्त करताहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते पालकमंत्री असले तरी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनात त्यांनी ढवळाढवळ कधी केली नाही. 

    उलट शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हक्कासाठी ते लढले. आता शासनात असताना सुद्धा बँकेविषयी ते परखड बोल त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे . जिल्हा बँकेचे एनपीए कमी केला याबाबत जी शेखी मिळविण्यात येते ते चुकीचे असल्याचे गुलाबरावांचे म्हणणे आहे. बँकेचा धंदा जो कर्ज वाटप पाया आहे ते कर्जच वाटणार नाही तर एनपीए वाढेल कसा ? शासनाकडून अनुदान आले तरी बँक कर्ज रोखते या पक्षपातीवर पालकमंत्र्यांनी केलेला प्रहार योग्यच आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची बँक काही लोक स्वतःची मालमत्ता समजतात . याला मंत्र्यांचा विरोध आहे. जिल्हा बँकेच्या या धोरणावर टीका करताना पाटलांचा रोख माजीमंत्री व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांचेवर आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेकर्यांचा ऊस त्यांच्या मुक्ताई साखर कारखान्याला पडेल त्या भावाने विकत घेता येते हे सत्य नाही काय ? या परिसंवादात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या . त्यामुळे शेतकऱ्यांची बँक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Gulabrao_Patil Jalgaon_Jilha_Sahakari_Bank
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif