जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा युवक काँग्रेस तर्फे शहरातील काव्यरत्नावली चौक येथे भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चीनि सैन्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या २० वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश सुभाषराव पाटील प्रमुख उपास्थीतीत होते.
चिनी सैन्यांनी गलवान व्हॅली येथे अतिक्रमण करत भारतीय सिमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भारतीय जवानांनी त्यांना उत्तर देत चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० जवान शाहिद झाले असून १७ जवान गंभीर रित्या जखमी झाले आहेत. सूत्रानुसार ४३ चिनी सैनिक भारतीय सेनेकडून मारल्या गेले असल्याची माहिती आहे.
या श्रद्धांजली कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस प्रा. हितेश पाटील,जळगाव तालुका अध्यक्ष पराग घोरपडे,आदेश वैद्य,विराज सोनी,नबील शेख, विमल वरयानी,जुगल जाधवानी,मासुम शेख इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

