
जळगाव – गेल्या अनेक महिन्यापासून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या बदली ची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर त्याच्या जागेवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी रत्नागिरी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अखेर प्रवीण मुंढे यांची बदली आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दबंग कामगिरी नंतर जळगाव जिल्ह्यात त्यांची झालेली बदली निर्णायक ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात वाढती गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कामकाजाचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना आपत्ती काळ असताना देखील गुन्हेगारी कळस हा वाढता आहे. तरुण तडफदार अधिकारी असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यात त्यांचा अधिक कल असेल असे सांगितले जाते आहे.