जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा ; डॉ संजीव पाटील यांची मागणी,

0

चाळीसगाव :- जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष डॉ संजीव पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी जळगाव जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे,त्या निवेदनात  जळगाव जिल्ह्यात १४०% पर्जन्यवृष्टी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व खरीप  ज्वारी बाजरी मका मुग उडीद कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे बळीराजा स धीर देण्यासाठी जळगाव जिल्हा त्वरीत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत आज चाळीसगाव येथे  तहसिलदार अमोल मोरे यांना चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यालय मंत्री अरुण पाटील व आर बी पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.