जळगाव : जळगाव जनता बँकेच्या 41 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे आयोजन संत बाबा हरदासराम समाज मंदिर येथे करण्यात आले होते. या सभेत बँकेच्या सभासदांना सन.2018-19 या वर्षासाठी 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून शहरात सार्वजनिक शौचालय बांधणे, ओपन जीम तयार करणे, रेनवॉटर हॉर्वेस्टींगला प्रोत्साहन देणे, सभासदांना वैद्यकीय मदतीत वाढ करणे,सौरउर्जा प्रकल्प उभारणे आदी विषयांवर काम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. सभेस 1700 सभासद उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात अनिल राव यांनी नमूद केले की, बँकेत युवक खातेदारांची संख्यादेखील वाढत असून डिजिटल व्यवहार करण्यार्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यांनी मागील वर्षी एटीएम,मोबाईल,प, आरटीजीएस, एनएफटी या द्वारे डिजिटल व्यवहार करणार्या खातेदारांची आकडेवारी नमूद केली. तसेच सन 2019-20 हे वर्ष डिजिटल वर्ष म्हणून बँक साजरे करणार असल्याची घोषणा अनिल राव यांनी केली. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नेट बँकींग सारख्या आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेतर्फे जळगाव शहरात महानगरपालिकेने 5 ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यास तत्वत: मंजुरी दिली असून हरीविठ्ठल,पोलीस मल्टी पर्पज हॉल या ठिकाणी लवकरच शौचालय उभारण्यात येणार आहे.बँकेमार्फत दुष्काळ निवारणासाठी जळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणे जसे मंदिर, देवस्थान अशा ठिकाणी बँकेमार्फत रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करून देण्यात येणार आहे. शहरातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यान,चर्चच्या मागे अथवा शिव कॉलनी या ठिकाणी ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. सभासदांच्या पोटी मतिमंद अपत्य जन्मास आले तर त्याचा सांभाळ केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मआश्रय माझे घरफ या संस्थेत करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे व त्याचा अर्धा खर्च बँक अदा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्षा भांडारकर यांच्या वंदे मातरम्ने सभेची सुरुवात झाली. सभेचे सूत्रसंचालन संचालक डॉ.अतुल सरोदे व सुरेश केसवाणी यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले.या नंतर अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या महनीय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील व राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल डॉ.गुरुमुख जगवानी यांचा,सी.ए.असोसीएशन चे अखिल भारतीय अध्यक्ष झाल्याबद्दल सी.ए.प्रफुल्ल छाजेड यांच्यासह लेखापाल प्रकाश पाठक,नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालक विद्याधर दंडवते यांचादेखील सत्कार करण्यात आला. तसेच बँकेचे उत्कृष्ट कर्जदार यांना जळगाव जनता उद्योजकता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित विविध प्रकल्पांमध्ये कामाची धुरा संभाळणार्या ज्येष्ठ कर्मचारी व अधिकारी यांचादेखील गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करणार्या बचत गटांचादेखील सत्कार करण्यात आला. तर, उत्कृष्ट कार्य करणार्या बँकेच्या शाखा व कर्मचार्यांचा गुण गौरव उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव व संचालक यांनी केला. या वेळी बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, केशवस्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर तसेच माजी संचालक व व्यासपीठावर बँकेच्या विविध शाखांचे स्थानिक सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते..
