धुळे :-धुळे :- बहुचर्चित जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज सोमवारी (ता.१५) धुळे जिल्हा न्यायालयात दिला जाणार होता. परंतू सलग चौथ्यांदा निकाल लांबणीवर गेला असून निकालाची पुढील तारीख १ ऑगस्ट २०१९ ही देण्यात आली आहे.
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत धुळे जिल्हा कोर्टात हा खटला सुरु आहे. या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. दरम्यान, आज १५ जुलै रोजी निकाल घोषित होण्याची अपेक्षा होती. परंतू न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील तारीख १ ऑगस्ट २०१९ ही दिली असून हा निकाल सलग चौथ्यांदा लांबणीवर गेला आहे. जर १ ऑगस्ट रोजी निकाल लागणार नसेल तर तीन दिवस आधी संशयितांच्या वकिलांना कळविण्यात येईल, असे हि न्यायाधीश सृष्टी नीळकंठ यांनी सांगितले. दरम्यान यावेळी सर्व संशयित आरोपी न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.