धुळे :- संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज सोमवारी (ता. १५) धुळे जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलाय. आज या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहाणार आहे.
या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ प्रकरणात निकाल देतील. निकालाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या या खटल्यात सोमवारी जवळपास सर्व संशयित आरोपी हजर राहण्याची चिन्हे आहे. या निकालाची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून आहे.