शिरसोली – येथे काल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाई – मित्रपक्ष आघाडीच्या जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. युती सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही , मतदारसंघाचा विकास गेल्या ५ वर्षात खुंटला आहे , शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी चा प्रश्न आदी मुद्द्यांवर यावेळी भाष्य करण्यात आले. आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून पवार साहेबांचे हात बळकट करण्याचे भावनिक आवाहन मान्यवरांनी आपल्या भाषणात केले. यावेळी व्यासपीठावर आघाडीच्या उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन , माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील साहेब , जळगांव ग्रामीण मतदारसंघाच्या विकासाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांचे सुपुत्र युवानेते विशाल देवकर , धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील , काँग्रेसचे धरणगाव तालुक्याचे अध्यक्ष रतिलाल चौधरी , राष्ट्रवादी जळगावचे तालुकाध्यक्ष बापूदादा परदेशी , राष्ट्रवादी धरणगावचे तालुकाध्यक्ष धनराज माळी , काँग्रेसचे जळगाव तालुक्याचे अध्यक्ष मनोज चौधरी , माजी जि. प. सदस्य रविंद्र भिलाजी पाटील , माजी जि. प. सदस्य पंकज महाजन , मार्केट कमिटीचे माजी सभापती एन. डी. पाटील , ग्रंथालय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील , राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ चव्हाण , जि. प. सदस्य संतोष आंबटकर , राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले , शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील , मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी , युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील , रा. युवक तालुकाध्यक्ष जळगाव विनायक चव्हाण , रा. युवक तालुकाध्यक्ष धरणगाव नाटेश्वर पवार , मागासवर्गीय तालुकाध्यक्ष धरणगाव श्रावण बागुल , म्हसावदचे मधुकर पाटील , शाम बारी , मिठाराम पाटील , नितीन बुंधे , विजय पुना बारी , अर्जुन पवार , जनार्दन पवार , योगेश बारी ( दातीर ) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून राजू रुपला काटोले यांनी जबाबदारी पार पाडली. जाहीर सभेचे सूत्रसंचालन संतोष आंबटकर यांनी केले. यावेळी आजी – माजी नगरसेवक – ग्रामपंचायत सदस्य – पं. स. सदस्य – जि. प. सदस्य , मार्केट कमिटीचे पदाधिकारी , मित्रपक्ष आघाडीचे विविध फ्रंटलचे अध्यक्ष व सदस्य , महिला पदाधिकारी , कार्यकर्ते व गावातील नागरीक बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.