जळगावात ४२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील अयोध्यानगरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी घालफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . दिपक लक्ष्मण पाटील (वय-४२) रा. अयोध्यानगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,  दिपक पाटील यांच्या सासुचे कन्सरचे ऑपरेशन झाले होते. त्यांना पाहण्यासाठी दिपक यांची पत्नी व दोन मुले माहेरी शहापूर ता. जामनेर येथे १७ एप्रिल रोजी गेल्याने  दिपक पाटील हे तळमजल्याच्या घरात एकटेच होते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारासत्यांचा लहान भाऊ चंद्रकांत पाटील हे त्यांना चहा देण्यासाठी गेले असता गळफास घेतल्याचा प्रकार आढळून आला . चंद्रकांत पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.