Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    जळगावात २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    By February 27, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : शहरातील जानकी नगरातील एका २० वर्षीय तरुणाने  स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. नीलेश दगडू वाघ (२०)  असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान,  नीलेश याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र तो पोलिसांच्या रेकॉर्डवर होता.

     

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश वाघ हा स्लाईडींगचे दरवाजे व खिडक्यांचे हातमजुरीवर कामे करायचा. शनिवारी गल्लीत कार्यक्रम असल्याने सकाळी ७.३० वाजता शेजारचा मित्र नीलेशला घरी बोलावण्यासाठी गेला. त्यावेळी थोड्यात वेळात येतो असे त्याने सांगितले. ९ वाजले तरी नीलेश आला नाही म्हणून हा मित्र परत बोलवायला गेला असता त्याने घरात मुलींच्या स्कार्फच्या सहाय्याने  गळफास घेतलेल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच बाहेर धुणीभांडी करायला गेलेली आई धावतच आली. मुलाला पाहून तिने एकच हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुधीर साळवी, मुदस्सर काझी यांनी घटनास्थळ गाठून तरुणांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

     

    बालपणीच हरपले पितृछत्र

    नीलेश हा लहान असतानाच वडिलांचे निधन झाले आहे. आई शंकुतलाबाई व बहिण असाच त्यांचा परिवार होता. बहिण विवाहित असून ती सासरी नांदते. आई धुणी भांडी धुण्याचे काम करते. नीलेशने आत्महत्या का केली याबाबत सर्वांना आश्‍चर्यचा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी आईच्या बोलण्यातून गल्लीतील काही जणांवर रोष असल्याचे जाणवल्याची माहीती पोलिसांनी दिली. दरम्यान, नीलेश याच्यावर नवरात्रीच्या काळात चॉपर हल्ला झाला होता. त्याशिवाय त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक गुन्हाही दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मिलींद सोनवणे, सदानंद नाईक यांनी पंचनामा केला. घरात चिठ्ठी व इतर काही संशयास्पद आढळून आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif