जळगाव;- सध्या कोरोनाची लाट ओसरली असली तरी दुसर्या लाटेची भीती असल्याने प्रशासन सतर्क असून त्या पृष्ठभूमीवर आज मनपाच्या पथकाने सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त मास्कविना वावरणाऱ्या आणि थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली . हि कारवाई अशीच सुरु राहावी असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे .
महापालिकेच्या पथकातर्फे आज सुभाष चौकात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मागर्दर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी दंड भरण्यावरून पथकाशी हुज्जत घातल्याचे पहावयास मिळाले. तर एकाची दुचाकी महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी उचलून घेतल्याने या तरुणाने तो दंड भरण्यास तयार असतांना देखील कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी जप्त केल्याची तक्रार केली. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. तर पालिका कर्मचाऱ्यांनी ते त्याच्याकडे रीतसर दंड भरण्याचे सांगत असतांना देखील त्याने दंड न भरल्याने ही कारवाई करण्यात आले असल्याचे सांगितले.
विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर प्रत्येकी २०० रुपयांचा दंड करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

