जळगाव : शहरातील मेहरूण तलाव चौपाटीवर संशयास्परित्या फिरणाऱ्या दोन तोतया पोलीसांना अटक करण्यात आली आहे. पवन रमेश काळे (वय-23, रा.तरसोद ता.जि. जळगाव) आणि रविंद्र भागवत चौधरी (वय-23 रा. भादली ता.जि. जळगाव) असे या दोन्ही तोतया पोलीसांची नावे आहेत. दरम्यान त्यांच्या ताब्यातील एअर गन व दुचाकी हस्तगत केली असून दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघे संशयित मेहरुण तलाव चौपाटी परीसरात रायसोनी फॉर्म हाऊसजवळील चौपाटीवर सायंकाळी एका इसमास थांबवुन काहीतरी विचारपुस करत होते. दोघा व्यक्तींकडे पोलीस विभागाची फायबर काठी आणि एकाकडे एअरगन आढळून आली. यावेळी दोन्ही तोतया पोलीसांनी चौपाटीवर बसलेला गौरव राजेंद्र पवार रा. चंदु अण्णा नगर, जळगाव याला तरूणाला दोघांनी तोतया पोलीसगीरी दाखविण्याचा प्रयत्न केला असता गौरव पवारने ‘तुम्ही पोलीस असल्याचा पुरावा दाखवा’ असे सांगितल्यानंतर त्यांनी ओळखपत्र नसल्याचे तोतयांनी सांगितले. यावरून एमआयडीसी पोलीसांनी पवन काळे आणि रविंद्र चौधरी यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात पोलीस विभागाच्या फायबरची कठी, पोलीस शिटी, स्पोर्टस् हंक्स मोटारसायकल आणि एक विनापरवाना एअरगन आढळून आली. दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दोघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. जितेंद्र राजपुत, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, पोका. सचिन चौधरी यांनी कारवाई केली. सचिन चौधरी यांनी विशेष कामगिरी केले असून त्यांच्याच फिर्यादीवरून दोघा तोतया पोलीसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.