जळगाव प्रतिनिधी । शिंपी समाज सावित्रीबाई महिला मंडळाच्यातर्फे बुधवारी दुपारी ४ वाजता वसंत पंचमीच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवकॉलनीत आयोजन करण्यात आले होते.
सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण माजी महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले व त्यांनी सर्व महिला भगिनींना वंसत पंचमी च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व वसंत पंचमीचे महत्व सांगितले. याप्रसंगी महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून महिलांना वान देण्यात आले.
याप्रसंगी भक्ति मंडळाध्यक्ष रेखा निकुंभ, आशा जगताप, विद्या सोनवणे, सारिका जगताप, व शोभा जगताप,सावित्री बाई मंडळाच्या पदाधिकारी मिना कापुरे, वर्षा शिंपी, स्नेहा सोनवणे, सोनल बाविस्कर, सुनिता सन्नासे, स्वाती सोनवणे, शुभांगी बाविस्कर, वैशाली शिंपी, सुनिता भांडारकर, संगीता कापुरे, तेजस्विनी कापुरे, प्रियंका शिंपी, सारिका शिंपी,रूपाली निकुभ, निलम शिंपी, रत्ना सन्नासे,हर्षिता खैरनार,सौ गाढे मँडम, शोभा भांडारकर, जेष्ठ समाज सेविका निर्मला शिंपी, सरोज खैरनार, शोभा भांडारकर भाजपा मंडल क्र ६च्या महिला अध्यक्षा निलाताई चौधरी, असंख्य महिला भगिनी उपस्थित होते.