जळगावात शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या

0

जळगाव दि. 29-
शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका दहावीच्या विद्यार्थिनीने पलंगाला साडीचा गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना दि.29 रोजी दुपारी अंदाजे 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान राहत्या घरी घडली. किर्ती पवन दुसाने (17) असे तिचे नाव आहे. ती श्रीराम कन्या माध्यमिक विद्यालय, मेहरुण या शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती. मंगळवारी आई व वडील कामावर गेले होते. ती व तिचा लहान भाऊ लोकेश दोघे शाळेत गेले नव्हते. दुपारी दोघांनी सोबत जेवण केले. लोकेश बाहेर खेळायला गेला होता. त्यानंतर किर्तीने पलंगाला साडीचा फास लावून आत्महत्या केली. दरम्यान दुपारी 2.30 वा. लोकेश घरी आल्यावर घराचे दार आतून बंद होते. बहिण दार उघडत नसल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता घटना समजली. त्याने तातडीने वडील पवन दत्तात्रय दुसाने व आई भारती यांनी तातडीने मोबाईलवर कळवले. पवन दुसाने हे सोनारी काम करतात तर आई भारती ह्या कंपनीत नोकरी करतात. दरम्यान तिचे प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता तिचे आई, वडील लहान भाऊ यांना शोक अनावर झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा तपास औद्योगिक वसाहत पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.