नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविणार असल्याचा सुनील खडके यांचा निर्धार

जळगाव: शहरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या जाणून घेण्यासाठी शहरात दि.23 नोव्हेंबरपासून ’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी पत्रकार परिषदेत दिली असून मनपाच्या प्रभागनिहाय दौरा करुन नागरिकांच्या मुलभूत समस्या जाणून त्या सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांच्यासोबत मनपा अधिकारी आणि कर्मचारी राहणार आहे . या पत्रकार परिषदेला माजी स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा,महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे,नगरसेविका गायत्री राणे,नगरसेवक अमित काळे उपस्थित होते.
’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमात नागरिकांचे मूलभूत प्रश्न जसे पक्के रासे , गटारी , परिसराची स्वछता , पाणी , पथदिवे यासह इतर समस्यांचा समावेश यात राहणार आहे. तसेच अमृत पाणी पुरवठा योजना,भूमिगत गटारी,प्रधानमंत्री आवास योजना,बायोमायनिंग,घनकचरा प्रकल्प आदी कामांना गती देण्यासाठी धोरणा ठरविण्यात येणार असल्याचे उपमहापौर खडके यांनी सांगितले. शहराचा संपूर्ण पाहणी दौरा झाल्यानंतर मुलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन त्याची अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुट्टीचा दिवस वगळून हा पाहणी दौरा राबविण्यात येणार आहे.
असा राहील पाहणी दौरा
’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम दि.२३नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दि.२३ रोजी प्रभाग क्रमांक १, दि.२४ रोजी प्रभाग क्रमांक २ ,दि.२५ रोजी प्रभाग क्रमांक ३ ,दि.२६ रोजी प्रभाग क्रमांक ४ दि.२७ रोजी प्रभाग क्रमांक ५ ,दि.१ रोजी प्रभाग क्रमांक ६ ,दि.२ रोजी प्रभाग क्रमांक ७,दि.३ रोजी प्रभाग क्रमांक ८, दि.९ रोजी प्रभाग क्रमांक ९ ,दि.७ रोजी प्रभाग क्रमांक १० , दि.८ रोजी प्रभाग क्रमांक ११ ,दि९ रोजी प्रभाग क्रमांक १२ ,दि१० रोजी प्रभाग क्रमांक १३ ,दि.११ रोजी प्रभाग क्रमांक १४ ,दि.१४ रोजी प्रभाग क्रमांक १५ ,दि.१५ रोजी प्रभाग क्रमांक १६ ,दि.१६ रोजी प्रभाग क्रमांक १७ ,दि.१७ रोजी प्रभाग क्रमांक १८ ,दि.१८ रोजी प्रभाग क्रमांक १९ असा दौरा असणार आहे.

