जळगावात युवक बिरादरी व बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशन तर्फे मोफत वृत्तपत्र वाचनालय

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

युवक बिरादरीचे महासंचालक पद्मश्री क्रांती शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन युवक बिरादरी व बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्या वतीने शहरात  १० ते ११ ठिकाणी मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर वाचनालयांचे पहील्या टप्प्यात  गणपती मंदिर, एम जे काॅलेज रोड; मुक्ताई नगर परिसरातील स्वामी समर्थ मंदीर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले, तर पुढील टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी वाचनालये सुरु केली जाणार आहेत.  युवक बिरादरीच्या जिल्हाध्यक्षा तथा बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुधा काबरा यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती वृध्दींगत होण्याच्या उद्देशाने वृत्तपत्र वाचनालये सुरू केली असल्याचे  त्यांनी सांगितले.

यावेळी युवक बिरादरीचे मार्गदर्शक तथा कबचौ उमवि रासेयो विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. उज्वला राठी, कार्यकारी संचालक प्रा. विजेंद्र पाटील, जिल्हा युवा समन्वयक आकाश धनगर, अनिल बाविस्कर यांच्यासह स्वयंसेवक रोहन अवचारे, अंजली मोरे, विलास पाटील, तूषार विसपुते आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.