जळगावात मालवाहू रिक्षेत आढळला युवकाचा मृतदेह

0

जळगाव | एका मालवाहू रिक्षेत ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील दाढीवाल्या बंगल्याजवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश बाबुराव राऊत (रा. सम्राट कॉलनी, मेहरूण) असे मृताचे नाव आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जगदीश हा मिळेल ते काम करायचा. तो दाढीवाला बंगल्याजवळील एका मालवाहू रिक्षेत दुपारी झोपलेला होता. रिक्षाचालक रिक्षा काढण्यासाठी आल्यानंतर त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.कळस्कर यांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. त्याला दारुचे व्यसन असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.