जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात तसेच केंद्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या खासगीकरणाविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज भारत बंदचे आवाहन केले होते. सकाळी दुकाने उघडली मात्र आंदोलकांनी सुरू असलेली दुकाने बंद करण्यास लावली. यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठा सकाळी बंद झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिक़ाणच्या व्यापारी संकूलात जावून दूकाने बंद करायला लावली.
फेसबुक लिंक
यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा मंगला पाटील, युवती अध्यक्षा कल्पीता पाटील, राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील, विनोद देशमुख, शहराध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादीचे विलास पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. जी. पाटील यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत शहरातील बाजारपेठा बंद करीत व्यापाऱ्यांना आंदेालनात सहभागी हेाण्याची आवाहन केले.