जळगावात बेकायदेशीर नॉयलॉन मांजाच्या साठ्यावर छापा

0

जळगाव प्रतिनिधी । पतंग उडविण्यासाठी नॉयलॉनचा दोऱ्यावर बंदी असूनही शहरातील बागवान मोहल्ल्यातील मोची गल्ली (पतंग गल्ली) परिसरात बेकायदेशीर नॉयलॉनचा मांजाचा मोठा साठ्यावर शनीपेठ पोलीसांनी छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

साधारणपणे ४० ते ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

अधिक माहिती अशी की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंग उडविण्यासाठी नॉयलॉनचा दोऱ्याला बंदी आहे. असे असतांना शहरातील बागवान मोहल्ल्यातील मोची गल्लीत मोठ्या प्रमाणावर नॉयलॉनचा मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार शहर व शनीपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास मोची गल्लीत कारवाई केली. यात साधारणपणे ४० ते ५० हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. सर्व मुद्देमाला शनीपेठ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित गोडावून मालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय वेरूळे, शनीपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, पोलिस उपनिरक्षक गणेश बुवा, पोउनि सुरेश सपकाळे, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार वासूदेव सोनवणे, तेजस मराठे, राहूल घेटे, योगेश इंदाटे, अनिल घुगे, उमेश पाटील, विजय निकुंभ, आणि जावेद तडवी यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.