जळगावात बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या !

0

जळगाव । येथील एका ५५ वर्षीय बांधकाम व्यवसायिकाने कामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. अनिल जगन्नाथ सुर्यवंशी (वय-५५ रा. अष्टभुजा नगर, पिंप्राळा) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल सुर्यवंशी बांधकाम व्यवसायीक असून त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचे बांधकामाच्या साईड सुरू आहेत. त्यापैकी तालुका पोलीस ठाण्याच्या समोर सृष्टी कंन्स्ट्रक्शनचे इमारती बांधकाम सुरू आहे. आज सकाळी ८ वाजता कामावर निघून गेले. आज दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच परीसरात राहत असलेल्या एका मुलीच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईक आणि मित्र मंडळीची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.