जळगावात प्रिंट केलेल्या बनावट नोटा जप्त !

0

दोघांना अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव :- झेरॉक्स मशीनवरून बनावट नोटांची प्रिंट काढून चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अमजदखान अफजलखान (वय २२) व शेख रईस शेख रशीद (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संशयितांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणली असल्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासात ते उघड होणार आहे.

तांबापुरा परिसरातील मच्छी बाजार परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी झेरॉक्स मशीनवरून १०० रुपयाच्या बनावट नोटांची प्रिंट मारली असून आज त्या नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची गुप्त खबरीवरून दोघांना अटक करण्यात आली. दोघांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये एकूण 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपयाच्या बनावट नोटा मिळून आल्या. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून झेरॉक्स मशीन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, रविंद्र भगवान पाटील, अनिल देशमुख, अनिल जाधव, सुधाकर रामदास अंभोरे, पोलीस नाईक अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक पाटील यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.