यावल ( प्रतिनिधी-
येथील पोलिस स्टेशनमधील कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रुपेश विश्वनाथ पाटील याने जळगाव येथे त्यांचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली शिव कॉलनी येथे तो भाड्याच्या घरात आई पत्नी मुलगा भाऊ यांच्या सोबत राहत होता तो 2012 मध्ये पोलीस दलात नोकरीला लागलेला होता अतिशय मनमिळावू व कोणालाही भावा प्रमाणेच प्रेम देणारा या तरुण पोलिस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे यावल शहरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत रामानंद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे त्याचे अंत्ययात्रे स्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे ‘ उपअधिक्षक रोहीत मतानी . यावल पी .आय.डी. के . परदेशी व पोलीस स्टॉफ उपस्थीत होता .