जळगाव :- भारताच्या हवाई दलाने पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला. या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर जनसामान्यांत उत्साहाचे वातावरण असून जल्लोष पहावयास मिळत आहे. जळगावातही या कारवाईचा जोरदार जल्लोष करण्यात आला.
जळगाव शहरातील टॉवर चौकात स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पुढाकाराने भारतीय वायुसेनेचे जोरदार स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी “भारत मत की जय, वंदे मातरम्” असे नारे देत एकमेकांना पेढा खाऊ एकमेकांना पेढा खाऊ घालून आनंद व्यक्त केला.
यावेळी वायुसेनेचे कौतुक करण्यासाठी नगरसेवक कैलास सोनावणे यांच्यासह राजकुमार अडवाणी, फारूक शेख, विजय वाणी आदी मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.