जळगावात तरुणाचा खून

0

जळगाव : शाहूनगरात जळकी मिल येथील गाळ्यांसमाेर रविवारी रात्री ८ वाजता एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत संशयास्पदरीत्या अाढळला.  मिलमध्ये मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून अल्तमश शेख शकिल (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

दरम्यान, या तरुणाच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. त्‍यानुसार पोलिसांनी तपास केला असताना सदर तरूणाचा खून केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन ते चार संशयितांना मध्यरात्री दीडच्या सुमारास ताब्‍यात घेतले.

 

मृत तरुणाचे वडील गोलाणी मार्केटमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयाशेजारी गॅरेजचे काम करून उदनिर्वाह चालवतात. घटनेचे वृत्त कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरूळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.