जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कृषीउत्पन्न बाजार समिती आवारातील दोन बंद दुकाने चोरट्यांनी फोडून एका दुकानातून १ लाख ३५ हजार रोकड व दुसऱ्या दुकानातून ५ हजार रोख अशी चोरी करून नंतर देान्ही दुकाने पेटवून दिल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रोकडसह चोरट्यांनी दुकानातील एलसीडी टीव्ही आणि एसी व इतर साहित्य चोरुन नेले आहे.

नंदलाल जीवनराम राठी (वय ६३, रा. हौसिंग सोसायटी, शाहूनगर) यांच्या मालकीचे बारदान व धान्य विक्रीचे दुकान आहे. तर पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या मालकीच्या बारदान विक्रीच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. सतरा रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून राठी हे घरी परतले होते . मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून तसेच दुकानाच्या आत असलेली खिडकी तोडली व दुकानातील पाच हजारांची रोकड लंपास केली. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी राठी यांचे दुकान पेटवून गेले या आगीत साठ्यांचे बँकेचे चेक बुक्स जमा खर्च’ एलआयसीची कागदपत्रे दुचाकी चारचाकी वाहनांचे आरसी बुक इशुरन्स टँक्स संबंधित कागदपत्रे तसेच दुकानातील फर्निचर एअरकंडिशनर इन्व्हर्टर व इतर साहित्य असे एकूण एक लाख रुपये किमतीचे साहित्य व कागदपत्रे जळून खाक झाली .घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पेालिसांनी पंचनामा केला असून लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या घटनेत जळून खाक झाले आहे.
राठी यांच्या दुकानात प्रताप केल्यानंतर चोरट्यांनी राठी यांच्या रांगेत असलेल्या पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या बारदान व धान्य विक्रीच्या दुकानाकडे मोर्चा वळवला . या दुकानाचाही चोरट्यांनी लोखंडी दरवाजा तोडून शोधात दुकानातून 1 लाख 35 हजार रुपये तसेच सीसीटीव्ही कॅमेराची हार्डिक्स’ डीव्हीआर, एलसीडी नेट राउटर असे एकुण 35 हजाराचे साहित्य असा 1 लाख 60 हजार किमतीचा ऐवज लांबविला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी हे दुकानही पेटवून दिले आगीत या दुकानातील एअरकंडिशनर खुर्ची टेबल फर्निचर असे एकूण चाळीस हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
