जळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी परिसरातील हॉटेल चिनार गार्डन समोर चिकन विक्री करणाऱ्या दोन्ही विक्रेत्यांमध्ये आज सकाळी वाद झाला. या झालेल्या वादातून एकमेकांवर वार करून दोन जण जखमी झाले. दरम्यान, या घटनेतील जखमी दोन जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, शिव कॉलनी परिसरात हॉटेल चिनार गार्डन जवळ चिकन विक्रेते चिकन विक्रीसाठी स्टॉल मांडून बसतात. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जळगाव चिकन सेंटर सद्दाम मेहमूद खाटीक (वय-27)रा.तंबापुरा आणि लालूभाऊ चिकन सेंटर चे इम्रान गमीर खाटीक विक्रेत्यांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्याने दोघांनी शस्त्रे हातात घेतले आणि एकमेकांवर वार केले. या घटनेत सद्दाम खाटीकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे तर इम्रान खाटीकच्या हाताला दुखापत झाली आहे. दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.