जळगाव:- शहरातील प्रेम नगर परिसरातील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील 58 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना याप्रकरणी 28 जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शहरातील प्रेम नगर परिसरातील रहिवासी असलेल्या प्रतिभा सुभाष बडगुजर (५८, रा. प्रेमनगर ) हे आपल्या मुलासह रहायला असून याच परिसरात त्यांची मुलगी राहते. गुरुवारी रात्री त्या मुलीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून त्यांच्या घरातून चांदीचे ताबे, फुलपात्र, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, चांदीचा आकडा असा एकूण ५८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. शुक्रवारी सकाळी प्रतिभा बडगुजर घरी आल्या त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार गुलाब सैंदाणे हे करीत आहेत.