जळगाव ;- शहरात घरफोड्या करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.तिघांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना २४ पर्यंत कोठडी सुनावली आहे. तिघांना पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यात सोपविण्यात आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दूध फेडरेशन परिसरातील वाघुळदे नगरातील घरफोडी करुन एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविणार्या विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (२५), पंकज उर्फ गोलु समुद्रे (२२) व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (२८) सर्व रा.राजमालती नगर, दूध फेडरेशनजवळ यांनी वाघुळदे नगर प्लॉट नंबर ५७ प्रथमेश अपार्टमेंट जवळील यश संजय ठाकूर यांच्या राहत्या घरून एलसीडी टीव्ही, मोबाइल फोन, व ठाकूर यांचे शैक्षणिक कागदपत्रे, मार्केटिंग करता वापरत असलेली बॅग तसेच त्यांच्या आईचे शिरपुर बँक ऑफ इंडिया, गॅस बुक, ओरिएन्टल बँक पास बुक, दानपेटी आदी साहित्य चोरून नेले होते. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार बकाले यांनी उपनिरीक्षक रवींद्रसिंग गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन व अशोक पाटील यांचे पथक दूध फेडरेशन, सुरत रेल्वे गेट या भागात कार्यरत ठेवले. या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व शैक्षणिक कागदपत्रे, एलसीडी टीव्ही, मोबाईल फोन, बँकेचे कागदपत्रे काढून दिले.