जळगाव- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व खान्देश माळी महासंघ यांच्यातर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.महात्मा फुले व्यापारी संकुलात असलेल्या महात्मा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे, उपमहापौर सुनील खडके भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजतासपकाळे, भरत कोळी, शहर अभियंता अरविंद भोसले , शालिग्राम मालकर मुरलीधर महाज,न प्रकाश महाजन, समता परिषध जिल्हा कार्यध्यक्ष वसंत पाटील, गजानन महाजन, महिला अध्यक्ष सरीता कोल्हे, निवेदिता ताठे, महानगर प्रमुख भारती काळे, नंदू माळी, विवेक महाजन, चंद्रकांत पाटील, जय चौधरी, सौ, शिंपी, वैशाली महाजन,गोपी सपकाळे आदी उपस्थित होते. अ. भा महात्मा फुले समता परिषध जिल्हा कार्यध्यक्ष वसंत पाटील तसेच फुले मार्केट येथील सर्व हॉकर्स बांधव यांनी सहकार्य केले.